Advertisement

वाधवान बंधूंना शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत हजर

गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता (special principal secretory amitabh gupta) पुन्हा एकदा सेवेत हजर झाले आहेत.

वाधवान बंधूंना शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत हजर
SHARES

येस बँक, एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंना (wadhawan brothers) संचारबंदीच्या काळातही महाबळेश्वरला जाण्यासाठी विशेष परवानगीचं पत्र देणारे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता (special principal secretory amitabh gupta) पुन्हा एकदा सेवेत हजर झाले आहेत. 

अहवाल सादर

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या समितीची नेमणूकही (inquiry committee) सरकारने केली होती. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर करण्यात आला होता. 

हेही वाचा - वाधवान बंधूला पत्र देण्यासाठी प्रधान सचिवांवर दबाव नव्हता- अनिल देशमुख

केवळ समज

या चौकशी समितीसमोर साक्ष देताना वाधवान बंधूंना कुणाच्याही शिफारसीने नव्हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष पत्र दिल्याची कबुली अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीदही देऊन सोडण्यात आलं आहे. त्यामुळे ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

राज्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लाॅकडाऊन करण्यात आलेलं असताना गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या विशेष परवानगीचं शिफारस पत्र घेऊन वाधवान बंधू आपलं कुटुंब आणि नोकरचाकरासह बेकायदेशीररित्या प्रवास करून आधी मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्वरला गेले. तिथं पाचगणी पोलिसांनी वाधवान कुटुंबातील २३ जणांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. 

त्यानंतर या सगळ्यांना जवळच्याच महाविद्यालयात क्वारंटाईन (quarantine) करून ठेवण्यात आलं होतं. २२ एप्रिलला त्यांच्या क्वारंटाईनची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना आता सीबीआयच्या ताब्यात सोपवलं आहे.

या प्रकरणावर मोठा गदारोळ झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक केली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा