Advertisement

चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे

मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावी जाऊ द्यायचं की नाही, याबाबचा गोंधळ कायम आहे. यावर बोट ठेवताना चाकरमान्यांबाबतचं धोरण निश्चित करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारला केली आहे.

चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे
SHARES

मुंबई महानगर प्रदेशासोबतच पुणे, नागपूर इ. शहरं ही रेड झोनमध्ये येत असल्याने या शहरांच्या सीमा ओलांडण्यावरील निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत. परप्रांतीयांना राज्य सोडून जाण्यास परवानगी देण्यात आलेली असली, तरी मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावी जाऊ द्यायचं की नाही, याबाबचा गोंधळ कायम आहे. यावर बोट ठेवताना चाकरमान्यांबाबतचं धोरण निश्चित करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारला केली आहे.

परप्रांतीयांसाठी व्यवस्था, पण...

कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत देशव्यापी लाॅकडाऊन वाढवला आहे. लाॅकडाऊन वाढवतानाच गृह विभागाने पत्रक काढत परप्रांतीयांसोबतच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांना आपापल्या घरी परतण्यासाठी प्रवास करण्याची मुभा दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अटीशर्थींचं पालन करत महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु अशी कुठलीही व्यवस्था जिल्ह्याजिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांसाठी अजून तरी करण्यात आलेली नाही. 

हेही वाचा - जिल्ह्यांच्या सीमा अजून काही दिवस बंदच, घरी परतण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी वाचाच

चाकरमानी संभ्रमात

त्यातच आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात प्रवासास बंदी असेल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून गावी जाण्यास मिळणार की नाही, अशा संभ्रमात चाकरमानी अडकले आहेत. 

या गोंधळवार बोट ठेवताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, राज्य सरकारने एकदाच काय ते मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दलचं धोरण निश्चित करावं. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नावं मागितली जात आहेत, तर कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. सरकारने उशीर होणायाआधी यावर स्पष्टीकरण द्यावं.

सरकारच्या भूमिकेकडे सध्या मुंबईतून गावी जाण्यास आणि गावाहून मुंबईत अडलेल्या तमाम चाकरमान्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा - IFSC मुंबईतच ठेवा, नाहीतर देशाचं आर्थिक नुकसान- शरद पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा