Advertisement

जिल्ह्यांच्या सीमा अजून काही दिवस बंदच, घरी परतण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी वाचाच

सध्याच्या स्थितीतही आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध कायम असल्याने जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्ह्यांच्या सीमा अजून काही दिवस बंदच, घरी परतण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी वाचाच
SHARES

कोरोना संसर्ग रोखताना घ्यावयाच्या काळजीसोबत राज्याचं रुतलेलं अर्थचक्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी रेड झोन वगळून ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना लाॅकडाऊनमधून अंशत: परवानगी देण्यात आली आहे. जिल्हांतर्गत सार्वजनिक वाहतुकीलाही चालना देण्यात येत आहे. परंतु सध्याच्या स्थितीतही आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध कायम असल्याने जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

परप्रांतीयांना प्राधान्य

देशव्यापी लाॅकडाऊन १७ मे पर्यंत वाढवतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने पत्रक काढत अटीशर्थींनुसार देशभरातील विविध राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरीतांना ४ मे पासून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. याच पद्धतीने राज्यांत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या लोकांनाही आपापल्या घरी परतण्यास मुभा देण्यात आलेली आहे. या नियमांचं पालन करत महाराष्ट्र सरकारने विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून परप्रांतीयांना राज्याबाहेर पाठवण्यास सुरूवात केली असली, तरी अजूनतरी जिल्हांतर्गत अडलेली लोकं सरकारच्या वाहतूक व्यवस्थेची वाट बघत आहेत. 

हेही वाचा - देशातील लॉकडाऊन आणखी २ आठवड्यांनी वाढला, केंद्रीय गृह मंत्रालयाने केली घोषणा

आर्थिक व्यवहारांना चालना 

राज्य सरकारने यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता उपाययोजना सुरू आहे. सरकारकडून आर्थिक व्यवहारांना हळूहळू चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत. कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी उद्योग सुरू, तर अनेक ठिकाणी नियमांची पूर्तता करून लवकरच उद्योग सुरू होतील.

अनावश्यक गर्दी टाळा

जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू केल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

प्रवासावर निर्बंध कायम

असं असताना रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. त्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात प्रवासास बंदी असणार आहे. मात्र, वैद्यकीय कारणामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी असेल. आतापर्यंत अशा कारणांसाठी ५६ हजार ६०० नागरिकांना परवानगी देण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.

 हेही वाचा - झुंबड कराल, तर राज्याबाहेर जाण्याची परवानगी रद्द- उद्धव ठाकरे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा