Advertisement

आपण ज्ञानाचा दिवा लावूयात- शरद पवार

शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सोमवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजातील महापुरूषांची जयंती घरातच राहून साजरी करण्याचा संदेश दिला.

आपण ज्ञानाचा दिवा लावूयात- शरद पवार
SHARES

येत्या ११ एप्रिल राेजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती (mahatma phule jayanti) आहे. या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी मिळून ज्ञानाचा दिवा लावूयात, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp chief sharad pawar) यांनी जनतेला उद्देशून केलं. शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सोमवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजातील महापुरूषांची जयंती घरातच राहून साजरी करण्याचा संदेश दिला.

आठवडाभर कळ सोसा

जनतेशी संवाद साधताना शरद पवार (Ncp chief sharad pawar) यांनी पुन्हा एकदा सर्वांना संयम राखण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, देशात लॉकडाऊन (lockdown) जाहीर होऊन आजचा तेरावा दिवस आहे. अजून ८ दिवस शिल्लक आहेत. या उरलेल्या दिवसांत सर्वांनी संयम ठेवून प्रशासनाने केलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. संयम आणि शिस्त न पाळणाऱ्या इतर देशांचं चित्र पाहिल्यास अत्यंत भयावह आहे. 

हेही वाचा - देशाला इव्हेंटची नाही, इलाजाची गरज, बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका

मरकज होऊ दिलं नाही

कोरोनाचं संकट वाढत असताना अशा संवेदनशील काळात हजरत निजामुद्दीनमधील (nizamuddin delhi) मरकजसारखे (markez) संमेलन होण्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रातही असा कार्यक्रम घेण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही परवानगी नाकारली. हीच भूमिका दिल्लीत घेतली गेली असती, तर सांप्रदायिक तेढ वाढण्याची संधी मिळाली नसती.

ज्ञानाचा दिवा पेटवा

लोकांना एकत्रित येण्यासाठी काही सण वा प्रसंग कारणीभूत ठरतील का, याची काळजी आतापासून घेणं गरजेचं आहे. महावीर जयंतीनंतर ८ एप्रिलला शब-ए-बारातचा कार्यक्रम आहे. त्यानंतर ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंती, तर १४ एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (ambedkar jayanti) यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात ज्ञान वाढवण्याचं काम केलं. आपण एक दिवा ज्ञानाचा लावून हा दिवस घरी राहून साजरा करूया. तसंच डाॅ. आंबेडकर यांनी अंधश्रद्धेचं समर्थन केलं नाही. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते. यातून चिकित्सेचा मार्ग थांबतो. काहीही झालं तरी माणसाने दैववादी होऊ नये. माणसाने सदैव चिकित्सक असलं पाहिजे, ज्ञानाचे समर्थन करण्याची भूमिका स्वीकारावी, अशी भूमिका मांडली होती. याच रस्त्याने जाण्याचा आपण निर्धार करू आणि. १४ एप्रिलला एक दिवा संविधानाचा लावून डॉ. आंबेडकरांचं घरातच राहून स्मरण करूया, असं आवाहनही पवार यांनी केलं.

हेही वाचा - जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर पुन्हा टीका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सध्या आपणा सर्वांना एक निश्चय करायचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून कोरोनावर मात करायची आहे. कोरोनाविरोधात जिंकण्याचा इतिहास आपण रचू, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा