Advertisement

राज ठाकरेंचा सल्ला केंद्राने ऐकला? गृह मंत्रालयाने दिली ‘ही’ दुकानं उघडायला परवानगी

केंद्र सरकारने शुक्रवारी काही दुकानं (shops) उघडण्यास परवानगी दिली असून शनिवारी यासंबंधीचं परिपत्रक जारी केलं आहे.

राज ठाकरेंचा सल्ला केंद्राने ऐकला? गृह मंत्रालयाने दिली ‘ही’ दुकानं उघडायला परवानगी
SHARES

कोरोनाचा संसर्ग (coronavirus) वाढू नये म्हणून देशभरात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील उद्योगधंदे ठप्प झालेत. बहुतेक सर्वच राज्यांच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. हे ध्यानात घेऊन केंद्र सरकारने शुक्रवारी काही दुकानं (shops) उघडण्यास परवानगी दिली असून शनिवारी यासंबंधीचं परिपत्रक जारी केलं आहे.

महसुलाचा विचार पहिला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. सोबत राज्यातील वाईन शाॅप आणि हाॅटेलमधील पार्सल (wine shops and hotels) सेवा सुरू करण्याची सूचनाही केली. खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे? 'वाईन शॉप्स' सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा- वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

हाॅटेल ही गरज

त्याचप्रमाणे गेले ३५ दिवस महाराष्ट्र राज्यातील उपहारगृहं आणि रेस्टोरंटस पूर्णपणे ठप्प आहेत. ह्याचा फटका जसा हॉटेल व्यावसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसला आहे, तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरांमध्ये 'हॉटेल' ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर ती गरज बनली आहे. अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

केंद्राचं परिपत्रक

त्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडायला सशर्त परवानगी दिली. परंतु नेमकी कोणती दुकानं उघडता येतील याबाबत स्पष्टता नसल्याने शनिवारी सकाळी केंद्र सरकारने परिपत्रक काढत खुलासा केला. 

‘ही’ दुकानं सुरू

त्यानुसार महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकानं आणि रेसिडेन्शियल कॉप्लेक्समधील दुकानं उघडण्यास परवानगी. गाव पातळीवरील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी. ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूं पोहोचवण्याची परवानगी. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच ही सूट असेल. सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा असेल.

हेही वाचा- शिवभोजन थाळींची संख्या दीड लाखांवर

‘ही’ दुकानं बंद

तर, राज्यांनी किंवा केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या कॅन्टोनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी कोणतीही दुकानं सुरू करायला परवानगी नसेल. शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. बाजारपेठांमधील दुकानं उघडण्यास परवानगी नसेल. याव्यतिरिक्त मद्य विक्री करणाऱ्या दुकांनानाही मनाई असेल.

राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार कुठली दुकानं सुरू ठेवायची यावर निर्णय घेऊ शकतात. काम करताना प्रत्येक कामगाराला मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा