Advertisement

राज्यपालांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित

मुख्यमंत्र्यांनी सकाळीच राज्यपालांशी चर्चा केल्याने ते बैठकीला अनुपस्थित राहिल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यपालांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित
SHARES

महाराष्ट्रात फैलावत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत? लॉकडाऊनमुळे (lockdown) राज्याच्या अर्थव्यवस्थेला कसा फटका बसला आहे? या संकटातून बाहेर येण्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लान काय आहे? या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

राज्यपालांना माहिती

राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या मलबार हिल येथील राजभवन (rajbhavan) इथं हे बैठक बुधवार २० मे रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी सकाळीच राज्यपालांशी चर्चा केल्याने ते बैठकीला अनुपस्थित राहिल्याचं (cm uddhav thackeray absent at meeting with bhagat singh koshyari) सांगण्यात येत आहे. परंतु सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, विविध विभागांचे सचिव, पोलीस महासंचालक व अन्य प्रमुख अधिकारी या बैठकीला हजर होते. या सर्व अधिकाऱ्यांनी कोरोनाबाबतची सविस्तर माहिती राज्यपालांना दिल्याचं सांगण्यात आलं.

हेही वाचा - महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी

आर्थिक पॅकेजची मागणी

दरम्यान कोरोनाचे संकट (coronavirus) हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरलं असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचा आरोप करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी राज्यपालांची भेट घेत याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. सोबतच इतर सर्व राज्यं विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी (stimulus package for maharashtra) मागणीही फडणवीस यांनी सरकारकडे केली होती.

भाजपचं आंदोलन

तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपने मेरा आंगण, मेरा रणांगण आंदोलनाची घोषणा केली. शुक्रवार २२ मे रोजी राज्यातील नागरिकांनी घराबाहेर येऊन काळ्या फिती, झेंडे दाखवून सरकारचा निषेध करावा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा