Advertisement

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात गोवा माॅडल राबवणार?

कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या गोवा राज्यातील माॅडेलचा (corona free goa model in maharashtra) महाराष्ट्रात वापर करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात गोवा माॅडल राबवणार?
SHARES

सातत्याने विविध प्रकारच्या उपाययोजना करूनही महाराष्ट्रात खासकरून मुंबईत फोफावणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यात अजूनही प्रशासकीय यंत्रणेला यश आलेलं नाही.  त्यातच कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या गोवा राज्यातील माॅडेलचा (corona free goa model in maharashtra) महाराष्ट्रात वापर करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

घरोघरी जाऊन सर्वेक्षण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीयअधिकाऱ्यांसोबत नुकतीच चर्चा केली. या चर्चेत गोव्यातील (goa) यशस्वी माॅडेलकडे त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्याएवढ्या आकाराचा गोवा आहे. परंतु गोव्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण (door to door survey) करण्यात आलं. कोरोनाबाबत कठोर उपायोजना करण्यात आल्या. त्यामुळे गोवा कोरोनामुक्त होऊन ग्रीनझोनमध्ये आला. याचपद्धतीने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण झालं पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

घरोघरी जाऊन रुग्णांचं सर्व्हेक्षण केल्यास कोरोनासोबतच पावसाळ्याशी संबंधित आजारांची माहिती देखील या निमित्ताने मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा - मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या- संजय राऊत

लाॅकडाऊनचा एक्झिट प्लान  

तसंच लॉकडाऊनचा एक्झिट प्लान (lock down exit plan) सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. चौथ्या टप्प्यातील लाॅकडाऊन मागे घेताना कुठल्या प्रकारचे निर्बंध शिथिल करता येतील, याचा विस्तृत तपशील देण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याशिवाय कंटेन्मेंट झोनच्या बाहेर कुठल्याही परिस्थितीत कोरोना येता कामा नये. म्हणून देशातील लाॅकडाऊन पूर्णपणे उघडल्यानंतर देखील जिल्ह्यांच्या सीमा न उघडण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.  

गोव्यात कोरोना रुग्ण?

दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात कोरोनाचा एक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी आहे. गोवा ग्रीन झोन झाल्यानंतरचं हे पहिलं प्रकरण आहे. या कोरोना रुग्णाला ट्रॅव्हेल हिस्ट्री असून तो गुजरातमधून आला होता. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

याशिवाय गोव्यात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये आणखी ७ जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्वजण मुंबईहून आले होते. या सातही जणांचे नमुने गोवा मेडिकल काॅलेजमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सगळ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्यास ही कोरोनामुक्त गोव्यासाठी वाईट बातमी असेल, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.   

हेही वाचा - विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरे बिनविरोध बनले आमदार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा