Advertisement

आठवड्याभरात मिळेल घरपोच पोषण आहार- यशोमती ठाकूर

अंगणवाडी सेविकांच्यामार्फत (Anganwadi sevika) वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (THR) (Nutrition diet) येत्या आठवड्याभरात सर्व बालकापर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

आठवड्याभरात मिळेल घरपोच पोषण आहार- यशोमती ठाकूर
SHARES

अंगणवाडी सेविकांच्यामार्फत (Anganwadi sevika) वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (THR) (Nutrition diet) येत्या आठवड्याभरात सर्व बालकापर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (women and child development minister yashomati thakur) यांनी दिली. 

ॲड. ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोषण आहार पुरवठा (home delivery Nutrition diet) अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला. यावेळी सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त इंद्रा मालो व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होत्या. ॲड.ठाकूर यांनी संबंधितांना घरपोच पोषण आहार संदर्भातील निर्देश दिले.

हेही वाचा - वाहन, आरोग्य विम्याचा प्रिमियम भरण्यासाठी आणखी मुदतवाढ

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही अंशी अडचणी निर्माण झाल्या होत्या. भारतीय अन्नधान्य महामंडळामार्फत पोषण आहारांअंतर्गत मिळणारं धान्य उपलब्ध झालं होतं. परंतु लॉकडाऊनमुळे (lockdown) हे धान्य वाहनात भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने तसंच धान्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

ॲड. ठाकूर यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून पोषण आहाराच्या धान्याची उचल तसंच वाहतूक त्वरीत होईल या अनुषंगाने निर्देश दिले. त्यानुसार धान्य उपलब्ध होण्याची कार्यवाही सुरू झाली असून सर्व जिल्ह्यात हे धान्य पोहोचलं आहे. एप्रिल तसंच मे २०२० साठी गर्भवती माता, स्तनदा माता तसंच ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन-टीएचआर) वितरीत करण्यात आला असून ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टीएचआर) २० एप्रिल २०२० पूर्वी वितरीत केला जाईल याची खात्री करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचं मानधन तसंच बाल संस्थांसाठीच्या अनुदान वितरणाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे, असंही मंत्री ॲड.ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा - लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या ३७०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा