Advertisement

अभ्यास पथकं पाठवून मोदी सरकारची राज्यांवर दादागिरी- जितेंद्र आव्हाड

पंतप्रधान टीव्हीवर येऊन नाट्यमय घोषणा करतात खरं, पण आज कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारं करत आहेत ही वस्तुस्थिती ध्यानात घ्या.

अभ्यास पथकं पाठवून मोदी सरकारची राज्यांवर दादागिरी- जितेंद्र आव्हाड
SHARES

मुंबई आणि पुणे महापालिकेच्या कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या भागांना केंद्रीय पथकाने नुकतीच भेट देत काही सूचना केल्या. केंद्रीय पथकाची ही दुसरी भेट होती. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. कुठलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार केवळ अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांवर दादागिरी करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर लगेच आव्हाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट टाकत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

फक्त नाट्यमय घोषणा

येणारा काळ आर्थिकदृष्ट्या अतिशय भयानक ठरणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. पंतप्रधान टीव्हीवर येऊन नाट्यमय घोषणा करतात खरं, पण आज कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारं करत आहेत ही वस्तुस्थिती ध्यानात घ्या. शिवाय सर्व आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवून पंतप्रधानांनी राज्य सरकारांच्या प्रयत्नांना फक्त खीळ घालायचा प्रयत्न केला आहे. 

हेही वाचा - ‘मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न’

रुग्णालयांचा फायदा

महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख आदी मुख्यमंत्र्यांच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रं, जिल्हा परिषदांची रुग्णालयं यांचं जे भक्कम जाळं निर्माण झालं त्यामुळेच आज आपला संघर्ष सुरू आहे. कुठलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांना दादागिरी मात्र नेमाने करत आहे. एक प्रकारचं आर्थिक अराजक निर्माण करायचं, संघराज्य पद्धतीचा साचा ढिला करायचा, आणि अलगद संसदीय लोकशाही मोडून अध्यक्षीय व्यवस्था आणायची, हा डाव आता दिसू लागला आहे.

लॉकडाऊन हा उपाय नाही, ते केवळ पॉज बटण आहे हे राहुल गांधी सतत का सांगताहेत त्याचा विचार करा. कोरोनाची समस्या गंभीर होऊ शकते हा इशारा त्यांनी १२ फेब्रुवारीला दिला होता. पण १५ मार्चपर्यंत भारतात कोरोना नाही असा मोदी सरकारचा दावा होता, हे आठवणीत असू द्या.

मुंबईला बदनाम करण्याचा डाव

या आधी देखील जितेंद्र आव्हाड  यांनी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे. असा आरोप केला होता.

हेही वाचा - जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, ठणठणीत बरे होऊन परतले घरी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा