Advertisement

पोलीस, पत्रकारांना कोरोनाची लागण चिंताजनक- अजित पवार

डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पोलीस, पत्रकारांना कोरोनाची लागण चिंताजनक- अजित पवार
SHARES

कोरोनाविरुद्धच्या (coronavirus) लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही मंडळी सुरक्षित राहिली पाहिजेत, त्यासाठी या सर्वांनी आपली कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

यशाला मर्यादा

राज्यातील कोरोनाग्रस्तांची (covid-19 positive) वाढती संख्या चिंताजनक असून अजूनही काहींना परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं नाही, हे दुर्दैव आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. टाळेबंदीच्या यशाला मर्यादा पडत आहेत. पोलिस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातच थांबण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. 

हेही वाचा - राज्यातील ६४ पोलिसांना कोरोनाची लागण, ३४ पोलीस मुंबईतले 

कुटुंबाची काळजी घ्या

नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर रोखता येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती जोखीम पत्करुन कोरोनाची लढाई लढत आहेत. त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले. कर्तव्य बजावताना या सर्वांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनीही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी  केलं.

 पोलीस, पत्रकारांना कोरोना

दरम्यान, पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवार २२ एप्रिल २०२० पर्यंत महाराष्ट्रातील ६४ पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोनाग्रस्त (covid-19) झाले आहेत. यामध्ये १२ पोलीस कर्मचारी आणि ५२ पोलीस काॅन्स्टेबल यांचा समावेश आहे. या ६४ पोलिसांपैकी जवळपास निम्मे म्हणजे ३४ पोलीस अधिकारी/कर्मचारी हे मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतील पोलीस विभागाची (mumbai police department) चिंता देखील वाढली आहे. 

तर, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनंतर पत्रकारांनाही कोरोनाची (covid-19) लागण झाली आहे. मुंबईतील ५३ पत्रकारांना (mumbai journalist) कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून कोरोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये १६८ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा