Coronavirus cases in Maharashtra: 235Mumbai: 93Pune: 32Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Coronavirus updates: तर, डाॅक्टर, रुग्णालयांवरही कारवाई, सरकारचा कडक इशारा

कोरोनाच्या धास्तीने काही खासगी रुग्णालये, डाॅक्टर्स इतर रुग्णांवर इलाज करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहेत, अशा डाॅक्टर आणि रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा बुधवारी राज्य सरकारकडून (maharashtra government) देण्यात आला आहे.

Coronavirus updates: तर, डाॅक्टर, रुग्णालयांवरही कारवाई, सरकारचा कडक इशारा
SHARE

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाचा मुकाबला करताना वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्वत:ला अक्षरश: झाेकून दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला याच आजाराच्या धास्तीने काही खासगी रुग्णालये, डाॅक्टर्स इतर रुग्णांवर इलाज करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहेत, अशा डाॅक्टर आणि रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा बुधवारी राज्य सरकारकडून (maharashtra government) देण्यात आला आहे. 

हेही वाचा- मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी, 'हे' आहेत संपर्क क्रमांक

कोराेना व्हायरसने (COVID-19) संक्रमित झालेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी कुठलंही खात्रीलायक औषध उपलब्ध नसताना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आपलं सगळं ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून या रुग्णांचा जीव वाचवत आहेत. खासकरून सरकारी रुग्णालयातील डाॅक्टर्स, नर्स, वाॅर्डबाॅय, वैद्यकीय प्रयोगशाळेतील तज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांचा यांत समावेश आहे. स्वत: लाही कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करून हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ रुग्णांवर ठिकठिकाणी उपचार करण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. काही खासगी रुग्णालयांकडूनही याकामी सरकारची मदत होत आहे. 

आरोग्याशी निगडीत अशा आणीबाणीच्या काळात इतर आजारांनी त्रस्त रुग्णांवर उपचार करण्यास काही डाॅक्टर आणि खासगी (private doctors and hospitals) रुग्णालये टाळाटाळ करत असल्याचंही आढळून येत आहे. कोरोनाच्या भीतीने इतर रुग्णांना हात लावण्यास किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या अशा डाॅक्टर आणि रुग्णालयांवर सरकारकडून कडक कारवाई होणार आहे.

तसा स्पष्ट इशाराच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (health monister state rajendra yadravkar) यांनी दिला आहे. देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या डॉक्टर्स व खाजगी रुग्णालयावर कठोर कारवाई करणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- Corona Virus: कोट्यावधी रुपयांचा मास्कचा साठा जप्त, पाच जणांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या