Advertisement

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या १५६ जणांवर कारवाई- अनिल देशमुख

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ जणांवर राज्य शासनाने पर्यटन व्हिसा नियमाचा भंग केल्याबद्दल कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या १५६ जणांवर कारवाई- अनिल देशमुख
SHARES

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ जणांवर राज्य शासनाने पर्यटन व्हिसा नियमाचा भंग केल्याबद्दल कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाधित व्यकींच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात आली. या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आरोग्य यंत्रणेने चांगलं काम केल्याचं देशमुख म्हणाले. 

गृहमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं कोरोना प्रतिबंध विषयक आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - Coronavirus Update: कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट; ६६६० खाटांची उपलब्धता- राजेश टोपे 

यावेळी देशमुख म्हणाले, नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथील मरकज मध्ये सहभागी झालेले १ हजार ४०० तब्लिगी राज्यात आले होते. हे सर्वजण सापडले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या १५६ जणांना आपण अटक केली आहे. पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांनी त्याचा त्याच कारणासाठी वापर करणे आवश्यक आहे. पण तसं न केल्याने पर्यटक व्हिसाचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

मरकजचा दिल्ली प्रमाणेच राज्यात वसई येथेही कार्यक्रम घेण्याचं तब्लीगीचं नियोजन होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना परवानगी नाकारली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा - महापालिकेने बदलले कोरोना चाचणीचे नियम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा