Advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव
SHARES

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनानं शिरकाव केला आहे. शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे शरद पवार यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी कोरोनानं शिरकाव केल्यानं शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. दरम्यान शरद पवार यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

सिल्व्हर ओकमधील २ जण आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी ३ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 'शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत', असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, सध्यस्थितीत कोरोनानं सामान्यांसह राजकीय नेत्यांनाही घेरलं आहे.

   


हेही वाचा -

मुंबईकरांवरील पाणीटंचाईचं संकट लवकरच दुर होण्याची शक्यता

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा