Advertisement

PM Cares ची गरजच काय? वेगळ्या अकाऊंटवरून रामचंद्र गुहा यांची पंतप्रधानांवर टीका

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मदत निधीचा ओघही वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स नावाने एक वेगळं अकाऊंट उघडलं आहे.

PM Cares ची गरजच काय? वेगळ्या अकाऊंटवरून रामचंद्र गुहा यांची पंतप्रधानांवर टीका
SHARES

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मदत निधीचा ओघही वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स नावाने एक वेगळं अकाऊंट उघडलं आहे. इच्छुकांना या अकाऊंटमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी निधी जमा करता येतो. मात्र पंतप्रधानांच्या नावे उघडण्यात आलेल्या अकाऊंटवर काही जणांनी टीका केली आहे.  

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी हा राष्ट्रीय निधी वापरता येईल.

हेही वाचा - Coronavirus Update: कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका? राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३० वर

प्रधानमंत्री स्वतः या निधीचे अध्यक्ष असून संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत. यात दिलेली देणगी कर सवलतीला पात्र असून पी एम इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन पीएम-केअर्स निधीत योगदान देता येते.

पीएम-केअर्सचा खाते क्र. 2121PM20202 असून SBIN0000691 याचा आय एफ एस सी कोड आहे, तर SBININBB104  हा स्विफ्ट कोड आहे. pmcares@sbi हा यु.पी.आय. आयडी आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी नावाचं वेगळं अकाऊंट असताना पीएम केअर या नावाने नवा फंड उभारण्याची गरजच काय? आपल्या देशावर राष्ट्रीय संकट आहे. अशात देखील पंतप्रधान स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न प्रसिद्ध साहित्यिक रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे.

हेही वाचा - ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचं ६० टक्के वेतन कापणार

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफचं नामकरण पीएम केअर्स असं करावं. पंतप्रधान नरेंद मोदी यांना नावं बदलण्याची सवय आहे, त्याप्रमाणेच हे नावही बदलावं, असा खोचक सल्ला काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी दिला आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा