Advertisement

वाचा, ‘असे’ आहेत राज्यातले नवे २ झोन!

नव्या नियमावलीत रेड झोन आणि नॉन रेड झोन (red zone and non red zone) असे दोनच भाग ठेवण्यात आले आहे.

वाचा, ‘असे’ आहेत राज्यातले नवे २ झोन!
SHARES

कोरोना विषाणू (coronavirus) प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील (maharashtra lockdown 4.0) मार्गदर्शक सूचना (new guideline) मंगळवार १९ मे २०२० रोजी राज्य शासनाने जाहीर केल्या आहे. यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन (red zone and non red zone) असे दोनच भाग ठेवण्यात आले आहे. या झोननुसार राज्यातील जनतेला अत्यावश्यक सेवा आणि इतर सेवा उपलब्ध होणार आहेत. ही नवीन नियमावली २२ मे पासून लागू होणार आहे.

रेड झोनमध्ये कोण?

मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती हे महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. 

या आधी रेड झोनमध्ये मॉल, उद्योग, दुकाने, प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची परवानगी नव्हती.ती आता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे, पावसाळ्यापूर्वीची कामे या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही (वाणिज्यिक) कामे  करता येणार नाहीत. उत्पादन सुरु करता येणार नाही.

नाॅन रेड झोनमध्ये कोण?

त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा नॉन रेड झोन (आॅरेंज आणि ग्रीन झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. नाॅन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकाने सायंकाळी ५ पर्यंत उडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. 

हेही वाचा - महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

रात्रीची संचारबंदी

अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम १४४  आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल.

कंटेन्मेंट झोन्स कोणते?

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेन्मेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेन्मेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. 

निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेन्मेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन जाहीर करता येऊ शकेल. कंटेन्मेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत:  प्रतिबंध करण्यात आलं आहे.  

अन्यथा कारवाई 

कंटेन्मेंट झोनमध्ये आरोग्य विषयक प्रोटोकॉल मागील आदेशाप्रमाणेच लागू राहतील. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक अन्य कुठलीही सूचना, आदेश  जिल्हा, विभागीय, राज्य प्राधिकरणाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय काढता येणार नाहीत. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुार कारवाई केली जाईल. त्यासोबतच कलम भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसंच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा