Advertisement

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,

आता आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत कोरोना पोहोचला आहे.

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,
SHARES

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राजकीय क्षेत्रातील देखील व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अशोक चव्हाण, त्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली. आता आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत कोरोना पोहोचला आहे.

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवरील तीन सुरक्षारक्षकांना कोरोना झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवानं हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झालं असल्याचं देखील समजतंय. काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर या आजारातून हे दोन्ही नेते बरे होऊन सुखरूप बाहेर पडले.  

दरम्यान, सर्व परिस्थितीत पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात एक पत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांना लिहलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.



हेही वाचा

वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी मागणी

सरकारचे संकटमोचन, आता तुम्हीच धावून या, आशिष शेलारांची चक्क राऊतांना हाक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा