Advertisement

वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी मागणी

आदित्य ठाकरे यांचा शनिवार १३ जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपले हितचिंतक, मित्रमंडळी आणि शिवसैनिकांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे.

वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी मागणी
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे महाविकास आघाडी सरकारमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. आदित्य ठाकरे यांचा शनिवार १३ जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांनी (maharashtra environment minister aaditya thackeray will not celebrate his birthday due to coronavirus) आपले हितचिंतक, मित्रमंडळी आणि शिवसैनिकांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे.  

काय म्हटले आदित्य?

आपल्या ट्विटर अकाऊंटवर आदित्य ठाकरे यांनी पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या हितचिंतकांकडून काही अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणतात, आज आपल्या महाराष्ट्रावरच नव्हे, तर संपूर्ण जगावरच कोरोनाचं संकट आहे. गेले २-३ महिने आपण सगळेच एकत्रितपणे या संकटाविरूद्ध लढा देत आहोत. आणि हा लढा देत असताना आपणा सर्वांचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे. 

हेही वाचा - यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

१३ जूनला माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथं असाल, तिथूनच मला शुभेच्छा, आशीर्वाद द्यावेत. माझी तमाम शिवसैनिक, मित्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की, होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा खर्च टाळून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल. 

प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचं पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. जसं तुम्ही आजपर्यंत मला प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. तसंच प्रेम आणि आशीर्वाद यापुढंसुद्धा माझ्या सोबत राहील, हिच अपेक्षा, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

राज यांचीही विनंती

त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे यांनी लिहिलं आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जूनला असतो. आपल्या फेसबुक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र टाकलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा