Advertisement

coronavirus Update: शाळा-काॅलेज बंद, पण १०० टक्के लाॅक डाऊन नाहीच- राजेश टोपे

कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु १०० टक्के लाॅक डाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

coronavirus Update: शाळा-काॅलेज बंद, पण १०० टक्के लाॅक डाऊन नाहीच- राजेश टोपे
SHARES

कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु १०० टक्के लाॅक डाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (State health minister Rajesh tope) यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे (State health minister Rajesh tope) म्हणाले की, कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्यातील सर्व शाळा-काॅलेज (school and colleges close) बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचसोबत १०-१२ वी च्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश देण्याच्या सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा- Coronavirus Update: अंधेरीतील सेव्हन हिल्स हाॅस्पिटल BMC च्या ताब्यात, ५०० खाटांची सुविधा होणार

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्व तऱ्हेच्या उपाययोजना राज्य शासनाकडून करण्यात येत आहेत. जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पण जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेकांकडून सातत्याने लाॅक डाऊनची विचारणा करण्यात येत आहे. परंतु लाॅक डाऊन म्हणजे १०० टक्के बंद, तर तसा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, असा खुलासाही टोपे यांनी केला.  

मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. कार्यालयात जास्त लोकांना बोलावू नका. ई-मेलचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असं आवाहन करण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोरोनाचा कहर - LIVE UPDATES

राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायती निवडणुका येऊ घातल्या आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे. 

रेल्वे अधिकाऱ्यांना बोलावून रेल्वेचे डबे तसंच रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहात साफसफाई ठेवण्याच्या आणि स्वच्छतागृहात साबन, सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा