Advertisement

निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. वादळ येऊन ९ दिवस झाले. तरी स्थानिकांना राज्य सरकारची कोणतीही मदत मिळालेली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस
SHARES

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. वादळ येऊन ९ दिवस झाले. तरी स्थानिकांना राज्य सरकारची कोणतीही मदत मिळालेली नाही. ज्यांची घरे गेली आणि तात्पुरत्या (cyclone nisarga affected people not get any financial aid from maharashtra government says devendra fadnavis) शिबिरामध्ये राहतात, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. योग्य ठिकाणी निवार्‍याची सोय करून त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करण्याची गरज, असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी रायगडपासून आपल्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन इथं पत्रपरिषद घेतली.

उत्पन्नच बंद

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी नुकसानग्रस्तांना पुरेशी मदत मिळत नसल्याचं सांगितलं. शेती, फळबागांचं नुकसान झालं, तर पुढच्या वर्षी ते भरून निघत असतं. पण, इथं तर झाडंच राहिली नाहीत. पुढच्या ५ ते १० वर्षांनंतरच त्यांचं उत्पन्न सुरू होणार आहे. केवळ हेक्टरी मदत जाहीर करून भागणार नाही. नुकसानग्रस्तांना थेट आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. १०० टक्के अनुदानातून फळबाग योजनेचा लाभ दिला पाहिजे. मासेमारांचं तर फार मोठं नुकसान झालं आहे. मासेमारांसंदर्भात अजून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. होड्यांसाठी त्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी थाेडं महाराष्ट्रावरही ‘प्रेम’ दाखवावं- शरद पवार

घरांचंही नुकसान

घरांचं नुकसान झालं आहे. त्यांना टिन, सिमेंट पत्रे हवे आहेत. पण, त्याची काळाबाजारी होत आहे. वीज व्यवस्था सुरळीत होईल, याची तातडीने काळजी घेण्याची गरज आहे. अंधार तर आहेच, शिवाय पाणीपुरवठा योजना बंद आहे. प्रशासन प्रयत्न करीत असेल. पण, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. कुणाला मदत मिळते आहे, असे मला या दौर्‍यात दिसून आले नाही. शासन आणि प्रशासनाने अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

केंद्राची समिती

तात्पुरत्या निवार्‍यांची ठिकाणं गळतं आहेत. तिथंही पुरेशा सुविधा नाहीत. कोणतीही मदत पोहोचत नसल्याचं गावकर्‍यांनी सांगितलं. पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीसुद्धा चणचण आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या समस्यांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. बस आगारमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात लोक दाटीवाटीने ठेवलं आहेत, ती स्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. केंद्र सरकारने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी चमू गठीत केली आहे.

कोल्हापूर/सांगली पुराच्यावेळी कपडे आणि भांड्यासाठी ७५०० रूपये दिले होते. तात्पुरत्या निवार्‍यासाठी ३६ हजार आणि २४ हजार असे एकरकमी भाडे देण्याचा निर्णय केला होता. मला तुलना करायची नाही. पण, ठोस निर्णय घेण्याची ही वेळ आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - निकष बदलले, निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा