डबेवाल्यांचा मोदींना पाठिंबा

 Pali Hill
डबेवाल्यांचा मोदींना पाठिंबा

मुंबई - पाशचे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाचं मुंबईच्या डबेवाल्यांनी स्वागत केलंय. सोमवारी होणाऱ्या भारत बंद आदोलनांला आमचा पाठिंबा नाही, असं डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी स्पष्ट केलंय.

"नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आॅपरेशनमुळे काळ्या पैशापासून देशाला मुक्ती मिळेल. एखादा आजार बळावला तर तो आजार डाॅक्टर आॅपरेशन करून मुळापासून नष्ट करतो. थोडासा त्रास हा होतोच, पण आॅपरेशन यशस्वी झालं की आजारापासून रुग्णाला कायमची मुक्ती मिळते. शिर्डी, तिरुपती बालाजी, मुंबईत सिद्धिविनायक, लालबागचा राजा या देवतांचं दर्शन कित्येक तास लाइन लावून घेतो. मग आता देशासाठी लाइन लावायची वेळ आली, तर तक्रार का करायची?" असा सवालही त्यांनी केला.

Loading Comments