Advertisement

दादरच्या गुरुद्वारा तर्फे २५ हजार जेवणाच्या पॅकेट्सचे वाटप

दादरच्या गुरुद्वारानं (Dadar Gurudwara) इथल्या शेतकऱ्यांना तब्बल २५ हजार पुलावचे पॅकेट, केळी, डाळ-चपातीची सोय केली होती.

दादरच्या गुरुद्वारा तर्फे २५ हजार जेवणाच्या पॅकेट्सचे वाटप
SHARES

मुंबईच्या आझाद मैदानावर २५ जानेवारीपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दाखल झाले आहेत. दादरच्या गुरुद्वारानं (Dadar Gurudwara) इथल्या शेतकऱ्यांना तब्बल २५ हजार पुलावचे पॅकेट, केळी, डाळ-चपातीची सोय केली होती.

राज्यभरातून शेतकरी जमत असल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर मोठी गर्दी झाली आहे. या आंदोलक शेतकऱ्यांच्या अन्नाची सोय करण्यासाठी विविध सामाजिक संघटना हिरिरिनं समोर येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंघसभा गुरुद्वारातर्फे सुमारे २५ हजार फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले आहे.

तसंच, या गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणाचीसुद्धा सोय करण्यात आली होती. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणात केळी, डाळ-चपातीचे वाटप केले गेले.

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अनेक संगठना तसंच राजकीय नेते, मंत्र्यांकडून जेवण आणि पाणी पुरवलं जात आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जेवण तसंच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी जेवणाच्या १० हजार पॅकेट्सचं वाटप केलं.

दरम्यान, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद करण्यात आलीत. फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.



हेही वाचा

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा