Advertisement

फडणवीसांनी मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

फडणवीसांनी मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं : एकनाथ शिंदे
SHARES

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे (CM) नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. "

एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून आम्ही पुढे निघालो आहोत. एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही जात आहोत. गेल्या काही काळांमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्या मतदारसंघातील अडचणींची माहिती दिली, त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी केली. पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणे याचाही विचार आम्ही केला. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी होत्या, महाविकास आघाडीमध्ये त्यावर निर्णय घेता येत नव्हते. पक्षाचे 50 आमदार ज्यावेळी वेगळी भूमिका घेतात, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती."

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.



हेही वाचा

"यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…!" भाजपचा शिवसेनेला इशारा

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा