Advertisement

दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दरकेर यांच्या निवडीची घोषणा केली. दरेकर हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड
SHARES

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजप आमदार प्रविण दरेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर आणि भाई गिरकर यांचीही नावे आघाडीवर होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दरकेर यांच्या निवडीची घोषणा केली.  दरेकर हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

हेही वाचा- शिवस्मारकात भ्रष्टाचार नाही, चौकशीला सामोरे जाण्यास तयार- चंद्रकांत पाटील

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करण्यात येणर, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत पंकजा मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, दरेकर यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. 

हेही वाचा- सत्तेसाठी किती लाचारी? सावरकर वादावरून फडणवीसांची शिवसेनेवर टीका

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत होते. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केल्यावर त्यांच्या जवळचे असलेले दरेकरही मनसेत दाखल झाले.  २००९ ते १४ या कालावधीत ते मागाठणे विधानसभा मतदारसंघातील मनसेचे आमदार होते. २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मनसेला लागलेली उतरती कळा लक्षात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत मागाठणे मतदारसंघातून उमेदवारी मिळू न शकल्याने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा