Advertisement

पुढचे ५-१० वर्षे अर्थसंकल्पावर असेच पुस्तक लिहित रहा, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना सल्ला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp opposition leader devendra fadnavis) यांनी लिहिलेलं ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचं प्रकाशन ​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ​​​(Cm uddhav thackeray) यांच्या हस्ते करण्यात आलं.

पुढचे ५-१० वर्षे अर्थसंकल्पावर असेच पुस्तक लिहित रहा, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना सल्ला
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp opposition leader devendra fadnavis) यांनी लिहिलेलं ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांच्या हस्ते करण्यात आलं. या आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. तेव्हा पुढचे ५-१० वर्षे आमच्या अर्थसंकल्पावर असेच पुस्तक लिहित रहा म्हणजे आम्हाला आमच्या उणिवा कळतील व आम्ही पुढे जात राहू. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना चिमटा काढला.

विधानभवनात (vidhan bhavan) आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला  (budget made easy book launch) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- भाजपचे किती आमदार आमच्या संपर्कात हे त्यांना ठाऊक नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) म्हणाले की, देवेंद्रजी तुम्ही मला माझे मित्र म्हणवता, आपण मित्र आहोतच. त्याचमुळे की काय तुम्ही मला कळावं म्हणून सोप्या भाषेत अर्थसंकल्पावरील हे पुस्तक लिहिलंय. नाहीतर आजपर्यंत तुम्ही इतके अर्थसंकल्प बोललात, वाचलेत, सादर केलेत पण असं कधी याआधी लिहिलं नव्हतं. आज मला सोप्या भाषेत अर्थसंकल्प कसा बोलावा, वाचावा यापेक्षा तो कसा अंमलात आणावा याचंसुद्धा उत्तम उदाहरण मिळालं. म्हणजे तुम्ही हे पुस्तक लिहिलं आणि तुम्ही देखील या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आलात. आपला कार्यक्रम दुसऱ्याच्या खर्चाने कसा करायचा हे यातून मला दिसलं.

अर्थसंकल्पासारखा (budget) अत्यंत किचकट विषय आधी स्वत: समजून घेणं आणि तो त्याच सोप्या पद्धतीने इतरांना समजावून देणं, हे मोठं कौशल्याचं काम आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून अर्थसंकल्प सोप्या भाषेत मांडल्याबद्दल मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. मी आजपर्यंत कधीही अर्थसंकल्प सभागृहात सादर होताना पाहिलेला नाही. मराठीत कदाचित पहिल्यांदा असं पुस्तक लिहिलं गेलं असेल. त्यामुळे मी खरंच सांगतो की हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. कुठल्याही योजना राबवण्यासाठी अर्थाशिवाय संकल्प आणि संकल्पाशिवाय अर्थ असू शकत नाही. पण इतका मोठा देश आणि राज्य चालवत असताना नेमकं करायचं काय असा मोठा प्रश्न असतो. अर्थसंकल्प सादर करताना आपला खिसा कसा कापला जाणार याकडेच सर्वसामान्यांचं लक्ष असतं. आपण जो अर्थसंकल्प मांडतो, तो सगळा पैसा सर्वसामान्यांचा असतो. त्यामुळे सर्वसामान्याला कळलं पाहिजे की माझ्या पैशाचा वापर कसा होतोय. मी जो कर भरतोय त्याचा माझ्यासाठी काय उपयोग होतोय. त्यामुळे मला अशा आहे की आमचे अर्थमंत्री सर्वसामान्यांच्या खिशात भर टाकतील, असंही ठाकरे म्हणाले.  

हेही वाचा- हे सरकार नक्की चालवतंय कोण? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा