Advertisement

“नाना पटोलेंचं अभिनेत्यांबाबतचं वक्तव्य म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप”

नाना पटोले यांचं वक्तव्य म्हणजे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“नाना पटोलेंचं अभिनेत्यांबाबतचं वक्तव्य म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप”
SHARES

इंधन दरवाढीवर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी भूमिका जाहीर न केल्यास चित्रपट आणि शुटिंग बंद पाडू असा इशारा नुकताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यावर नाना पटोले यांचं वक्तव्य म्हणजे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील आझाद मैदानात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना नाना पटोले यांच्या इशाऱ्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, लिकडच्या काळामध्ये प्रसिद्धीकरीता अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. कारण त्यांना माहीत आहे की, अभिनेत्यांबद्दल एखादं वक्तव्य केलं, तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते. काही लोकांचं बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ, असंही आहे. याप्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचं काम चाललंय. त्यामुळे याला फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. असं कुणीही शुटिंग बंद करू शकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे.

हेही वाचा- कोण म्हणतंय संजय राठोड बेपत्ता आहेत?- अजित पवार

दरम्यान, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केलं आहे.

ज्या केंद्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकशाहीच्या मार्गावर चालणारं यूपीएचं सरकार होतं, तेव्हा पेट्रोल ७० रुपये प्रति लिटरवर गेल्यावर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.

आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. अश स्थितीत हे गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

यूपीए सरकारच्या काळात ते ज्या प्रकारे ट्विट करून भूमिका मांडत होते. तशी भूमिका त्यांनी मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या बाबतीतही मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा