Advertisement

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

उर्वरित मंत्री सरकार स्थापनेनंतर शपथ घेतील.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
SHARES

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर बंडखोर नेता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, याबाबत चर्चा सुरु आहेत.  

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असं शिंदे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा

"यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…!" भाजपचा शिवसेनेला इशारा

ते पुन्हा येणार! 1 जुलैला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा