मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात शिवसेना कोर्टात जाणार

  Mumbai
  मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात शिवसेना कोर्टात जाणार
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीत 12 लाख मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्यापैकी काहींची नावेच मतदार याद्यातून गायब झाल्याचे उघड झाले. आता याविरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

  शनिवारी नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. "12 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते.’ असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले.

  शिवसेनेने यासंदर्भात 1800228595 हा टोल फ्री नंबरही सुरू केला आहे. शिवसेनेने आवाहन केले आहे की मतदार यादीच्या घोळामुळे ज्या मतदारांना मतदान करता आले नाही, ते या टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकतात. या सर्व तक्रारी शिवसेना कोर्टात सादर करणार आहे. मुंबईत मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याची शंका आहे. कारण 2012च्या निवडणुकीत जी नावं होती त्यातील तब्बल 12 लाख नावे यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे हे मतदारांना मतदानाचा हक्कापासून यंदा वंचित राहिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.