Advertisement

विकलांगांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार


विकलांगांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार
SHARES

महालक्ष्मी - येथील आनंद निकेतन आश्रमात राहणाऱ्या विकलांग लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

आनंद निकेतनमध्ये राहत असलेल्या विकलांग नागरिकांचं म्हणणं आहे की, भारतात अपंगांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत. विमानतळ, पंचतारांकित हॉटेल्स सोडली तर हा विचार कुठल्याही सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी होताना दिसत नाही. शौचालयं, पुस्तकालयं, लो फ्लोअर बसेस उपलब्ध नाहीत. अंधांना बसस्थानकाची माहिती कळण्यासाठीची उद्घोषणा यंत्रणा कुठेही उपलब्ध नाही. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची ही विकलांगांसाठी नेहमीची अडचण. अपंगांसाठी सोयीस्कर शौचालयाची तर सगळीकडे गरज आहे. तिकीट-खिडक्याची उंची जास्त असल्यामुळे बुटक्या, व्हील चेअर वापरणाऱ्या आणि अपंग प्रवाशांना तिकीट घेण्यास अडचण होते. रेल्वेच्या अपंगांच्या डब्यात योग्य प्रकारची हँडल्स, बैठक व्यवस्था, मोकळी जागा उपलब्ध नाहीत. 95 टक्के रेल्वे स्थानकांवर रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था नाही.

आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात अश्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं, निवडणुका येतात, निवडणुका जातात. पण, आमचा विचार कोणत्याही राजकीय पक्षाकडून केला जात नाही. म्हणून आम्ही आमचा विरोध दर्शवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं वसंत सोळंकी यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा