...छप्पर फाडके !

  मुंबई  -  

  कुर्ला - महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहे. ज्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षणात गेले अशांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवली आहे. तर काहींनी पत्नीला उमेदवारी देणे शक्य नसल्यामुळे कुटुंबातील व्यक्तीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

  कुर्ल्यामध्ये मात्र एकाच घरात दोन व्यक्तींना नगरसेवक बनण्याच्या संधी चालून आल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 162 मधून प्रणव लांडे आणि 163 मधून दिलीप लांडे यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली आहे. दिलीप लांडे हे 163 मधून तीन वेळा नगरसेवक झालेत. वॉर्ड पुनर्रचनेनंतर दिलीप लांडे यांच्या वॉर्डचे विभाजन झाले. याचा फायदा घेण्यासाठी दिलीप लांडे यांचा मुलगा प्रणवला मनसेने उमेदवारी दिली.

  पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवणे सहज सोपे नाही. पण या वेळी चक्क पती-पत्नीसह बहीण-भाऊ, दीर-वहिनी, पिता-पुत्र निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यामुळे या वेळी निवडणूक चांगलीच रंगणार हे मात्र नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.