औषधांचं दान...

 Abhyudaya Nagar
औषधांचं दान...
औषधांचं दान...
See all

काळाचौकी - जायंट्स ग्रुप ऑफ काळाचौकी तर्फे एका वेगळ्या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या ग्रुपकडून काळाचौकी परिसरात औषध दानपेटी ठेवण्यात आली आहे. उरलेली चांगली आणि उपयोगी औषधे दानपेटीत जमा करावी हाच मुख्य हेतू या उपक्रमामागचा आहे. या दानपेट्या विभागातील औषध दुकानांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

ही औषधे परळ येथील विनामूल्य सेवा अभियान केंद्र 'जायंट्स इंटरनॅशनल'मार्फत योग्य रुग्णांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. या औषध दानपेटी केंद्राचेे उद्घाटन खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते कमल आणि गेटवेल मेडिकल स्टोर येथे करण्यात आले. यावेळी जायंट्स इंटरनेशनल फेडरेशन वनचे अध्यक्ष झकिर हुसेन कपासी, संचालक झोएब कामदार, डॉ.प्रागजी वाझा आदी मान्यवर उपस्थित होते. 'प्रत्येकाने आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत अभियानात सामिल व्हा' असं आवाहन जायंट्स ग्रुप ऑफ काळाचौकीचे अध्यक्ष शेखर छत्रे यांनी यावेळी केले.

Loading Comments