Advertisement

राजकारण करण्यापेक्षा कोरोनाच्या कामात लक्ष द्या, पवारांचा फडणवीसांना टोला

फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी हातभार लावण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

राजकारण करण्यापेक्षा कोरोनाच्या कामात लक्ष द्या, पवारांचा फडणवीसांना टोला
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे. परंतु विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना ज्याप्रकारे लक्ष्य करण्यात येत आहे, त्याकडे पाहता फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी हातभार लावण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. (dont do politics in corona pandemic sharad pawar advice devendra fadnavis)

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार

नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून त्याचा अहवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला. महाराष्ट्रात खासकरून मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. सरकार चाचण्या कमी करून कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या लपवत असल्याचा आरोपही फडणवीस सातत्याने सरकारवर करत आहे. 

रूग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढविणं नाही. तर त्याजोडीला पुरेसे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सुविधा मिळणं देखील अभिप्रेत आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचणी करणं हाच एकमेव मार्ग आहे. त्याकडे आपण का लक्ष देत नाही, हा मोठाच प्रश्न आहे, असं म्हणत फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, सध्याचा काळ हा कोणतंही राजकारण करण्याचा काळ नसून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या नावाखाली निव्वळ राजकारण करण्यापेक्षा कोरोनाचं संकट दूर कसं होईल, या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे लवकरच चांगले परिणाम दिसून येतील, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - Devendra Fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा