Advertisement

Ganesh Festival 2020: चाकरमान्यांनो, गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नका, जयराज साळगावकरांचं आवाहन

कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारने घातलेले असंख्य निर्बंध पाहता चाकरमान्यांना गावी जाणं अडचणीचं ठरू शकतं.

Ganesh Festival 2020: चाकरमान्यांनो, गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नका, जयराज साळगावकरांचं आवाहन
SHARES

गणेशोत्सव जवळ आल्याने चाकरमान्यांनी कोकणातील आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू केलेली आहे. परंतु कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारने घातलेले असंख्य निर्बंध पाहता चाकरमान्यांना गावी जाणं अडचणीचं ठरू शकतं. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहेत. यामुळे चाकरमान्यांनी कोकणात न जाता मुंबईतील आपल्या घरीच गणेशोत्सव साजरा करावा, असा मोलाचा सल्ला कालनिर्णयकार जयराज साळगावकर यांनी दिला आहे. (dont go konkan to celebrate ganesh festival says editor of kalnirnay jayraj salgaonkar)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयराज साळगावकर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत एसटीवर मोठा ताण आहे, त्यातच विरोधी पक्षाने संपाचं हत्यार उचलून धरलं आहे. एसटीची तिकटं मिळणंही मुश्कील आहे. जे कोणी कोकणातील गावी जातील, त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. गणपतीला गावी जाण्याऐवजी जर मुंबईतच गणपतीची भक्ती केली तर, ती देखील पोहचू शकते. आमचा देखील कोकणात गणपती होता. परंतु ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर यांनी तो मुंबईत आणला. त्यामुळे मुंबई काय किंवा कोकणात काय कुठेही गणपतीची भक्ती करता येते. या भक्तीमुळे कोकणी लोकांना त्रास होऊ नये आणि हा आजार पसरू नये, यासाठी कुठंही न जाता घरच्या घरी गणेशोत्सव साजरा केल्यास एकाप्रकारे कोकणाची काय, पूर्ण महाराष्ट्राची आणि गणपतीची भक्तीच होईल, असं आपल्याला वाटतं, असं साळगावकर यांनी सांगितलं.

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावी जातात. परंतु कोरोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तरीही ज्यांना कोकणात जायचं आहे, त्यांच्यासाठी एसटी बस सोडण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आधी अँटीजन टेस्ट करून जावं लागणार आहे. शिवाय गावी गेल्यावर काही दिवस क्वारंटाई देखील राहावं लागणार आहे. सरकारकडून अद्याप याबाबत कुठलेही   

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असणार आहे. गणेशोत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मिरवणुकाही काढता येणार नाहीत.

हेही वाचा - Ganesh Festival: कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आधीच करा कोरोना टेस्ट- नितेश राणे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा