Advertisement

आंबेडकर स्मारक १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करणार- अजित पवार

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं.

आंबेडकर स्मारक १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करणार- अजित पवार
SHARES

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिलं. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम गतीने सुरू असून निधीची कोणतीही कमतरता नाही तसंच भासू दिली जाणार नाही. हे स्मारक १४ एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण केलं जाईल, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. 

त्याआधी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावं, ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात १०० फूट पादपीठ आणि ३५० फूट उंचीचा पुतळा असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून या कामाचा सुरुवातीला खर्च करण्यात येणार आहे. या स्मारकाचं काम हे वेळेत पूर्ण व्हावं, अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं होतं.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळ तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळांना प्रत्येकी १०० कोटी रूपये देणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी यावेळी केली.

हेही वाचा- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी पुरेशा निधीची तरतूद- अजित पवार

हिंदूहृदयसम्राट दि.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपये देण्यात आले असून शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसह अर्थ संकल्पात जाहीर केलेल्या योजनांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 

सन २०२०-२१ मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात ८ टक्के घट झाली आहे. तरीही अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. गरीब व मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देण्यात येईल. याविषयीचा सविस्तर शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल.

अर्थसंकल्पात संपूर्ण राज्याचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. मुंबई (mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या विचारात घेऊन तेथील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी दिला आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

(dr babasaheb ambedkar memorial will complete before 14th april 2024 in mumbai says ajit pawar)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा