Advertisement

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी पुरेशा निधीची तरतूद- अजित पवार

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावं, ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी पुरेशा निधीची तरतूद- अजित पवार
SHARES

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावं, ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी ही माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले, मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावं, ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. १०० फूट पादपीठ आणि ३५० फूट उंचीचा पुतळा असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून या कामाचा सुरुवातीला खर्च करण्यात येणार आहे. या स्मारकाचं काम हे वेळेत पूर्ण व्हावं, अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

राज्यावर आलेल्या ‘कोरोना’च्या अभूतपूर्व संकटाचा सामना शासनाने अत्यंत धीराने आणि संयमाने केला. या लढ्यात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडीताईंसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कोरोनायोद्ध्यांनी पहिल्या फळीत राहून, जोखीम पत्करुन लोकांचे जीव वाचवले. 

हेही वाचा- “पुरवणी मागण्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांची बारामती आहे, मग मुख्यमंत्र्यांची मुंबई कुठे?”

लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांसह राज्यातल्या नागरिकांनी सरकारला समर्थपणे साथ दिली, त्यामुळेच राज्यातला कोरोना नियंत्रित राहू शकला, असं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यावरील ‘कोरोना’चे संकट अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे या संकटाचा सामना करताना मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणं या त्रिसूत्रीचा वापर सर्वांनी कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

‘कोरोना’ संकटकाळात (covid19) सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा, अशा महत्त्वाच्या विभागांच्या निधीला कोणत्याही प्रकारची कात्री लावण्यात आली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘कोरोना’ काळात राज्यभरात जंबो कोविड सेंटर, उपचार केंद्रासह आरोग्यविषयक कामांना निधी कमी पडू दिला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ‘कोविड’ संकटातून सावरण्यासाठी, राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी, बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे घर खरेदीचे व्यवहार वाढले. सर्वसामान्यांचं घर खरेदीचं स्वप्न साकार होण्यासही यामुळे मदत झाली.

राज्यात वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात नसली तरी ही मंडळे अस्तित्वात आहेत, असं गृहीत धरुन निधीचं वाटप ठरलेल्या सूत्रानुसारच करण्यात येईल. विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. ‘कोराना’मुळे राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्राकडे ‘जीएसटी’च्या परताव्याची ३२ हजार कोटींची थकबाकी आहे, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने ही थकबाकी तातडीने देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

(enough funds for dr babasaheb ambedkar memorial in mumbai says ajit pawar)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा