इ वॉर्डात फेरबदल

 Mazagaon
इ वॉर्डात फेरबदल

भायखळा - मुंबई महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार 'इ' वॉर्ड मधील संपूर्ण विभागाची रचनाच बदलली आहे. आधी इ वॉर्डमध्ये प्रभाग क्र 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209 असे प्रभाग क्रमांक होते. आता मात्र ते बदलून प्रभाग क्रमांक 207, 208, 209, 210, 211, 212, 213 अशी नवीन क्रमवारी झाली आहे. या बदलानुसार प्रभाक क्रमांक 204 चे क्रमांक आणि भौगोलिक रचना बदलून आता 204 हे 207 झाले आहे. 205 प्रभाग हे इ वॉर्डमधून वगळण्यात आले आहे.तसेच 202, 206, 207 आणि 208 या प्रभागातील सर्व भागातून भौगोलिक रचना बदलून यामधून 210 हा मागासवर्गीय महिला राखीव नवीन वॉर्ड निर्माण करण्यात आला आहे.

सध्याचे 208 प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांचा वॉर्ड हा महिला राखीव प्रभागात गेला आहे. आता त्यांची पत्नी या प्रभागातून निवडणूक लढवणार आणि ते स्वतः नागपाडा नवीन प्रभाग क्रमांकानुसार 213 मधून निवडणूक लढवणार आहेत. प्रभाक क्र.203 शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांचा प्रभाग हा भौगोलिकदृष्ट्या अर्धा 207 आणि अर्धा 208 मध्ये विभागला गेला आहे. पालिकेकडून अजून अधिकृत विभागवारीची माहिती मिळू शकलेली नसल्याने या प्रभागाच्या बदललेल्या रचनेचे चित्र स्पष्ट झालेलं नाही. विभागातील नगरसेवक देखील अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत असून ते मंगळवारी इ वॉर्ड च्या कार्यालयात धाव घेणार आहेत.

Loading Comments