ठाकरे सेनेचा बंधू वाद

Pali Hill
ठाकरे सेनेचा बंधू वाद
ठाकरे सेनेचा बंधू वाद
ठाकरे सेनेचा बंधू वाद
ठाकरे सेनेचा बंधू वाद
ठाकरे सेनेचा बंधू वाद
See all
मुंबई  -  

मुंबई - ठाकरे सेनेचा बंधू वाद आता आपल्याला नवा राहिलेला नाही. निवडणुका जवळ आल्या की या वादालाही रंग चढायला लागतो. यावेळी निमित्त आहे ते शिवसेनेने सुरू केलेल्या ‘डीड यू नो’ या प्रचार मोहिमेचे.

शिवसेनेने ‘डीड यू नो’ आशयाखाली सर्वत्र पोस्टर लावत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या पोस्टरविरोधात मनसेने ‘येस वुई नो’ आशयाची पोस्टर सीरिज सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या पोस्टरमधून मनसेने शिवसेनेच्या विकासकामांची खिल्ली उडवली आहे.
मनसेने व्हायरल केलेल्या पोस्टरमध्ये मुंबईतील खड्डे, महापालिका शाळांची अवस्था, बेस्ट दरवाढ, कचरा घोटाळा या विविध मुद्द्यांवरून शिवसेनेचा समाचार घेतला आहे. त्यात मुंबईकरांचे 182 कोटी रुपये खड्ड्यांत घालून मुंबईकरांच्या नशिबी खड्डेच आल्याचे सांगण्यात आले आहे. खड्ड्यांसोबतच बेस्टच्या किमान भाड्यात केलेल्या वाढीवर मनसेने टीका केली आहे.

 

 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.