Advertisement

उन्मेष जोशींची ‘ईडी’कडून ७ तास चौकशी, पुन्हा बोलवण्याची शक्यता

कोहिनूर इमारत प्रकरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने सोमवारी ७ तास कसून चौकशी केली.

उन्मेष जोशींची ‘ईडी’कडून ७ तास चौकशी, पुन्हा बोलवण्याची शक्यता
SHARES

कोहिनूर इमारत प्रकरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने सोमवारी ७ तास कसून चौकशी केली. ईडीला आपण चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत असून ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

सर्व प्रश्नांची उत्तरं दिली

कोहिनूर इमारत प्रकरणात ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत जोशी यांना देखील नोटीस बजावली आहे. त्यानुसार जोशी सोमवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. तिथं त्यांची ७ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडीकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. ईडीच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करत असून पुन्हा आपल्याला चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असंही ते म्हणाले.  

सूडाचं राजकारण

राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीवरून राज्यात जोरदार राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसहीत इतर विरोधी पक्षांनी सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा दावा केला आहे. तर मनसे २२ आॅगस्ट रोजी ठाण्यात बंद पाळणार आहे. याच दिवशी राज यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.



हेही वाचा- 

चूक नसेल, तर घाबरण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

राज यांना पाठवलेली ईडीची नोटीस सूडबुद्धीनेच- बाळासाहेब थोरात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा