2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती तुटल्यानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. युती तोडण्याचा निर्णय आधीच झाला होता, मी केवळ त्यांची घोषणा केली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यावेळी युती तोडली नसती तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, असेही खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे म्हणाले की, 2014 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्रकियेत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आग्रही होती, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.
शिवसेना आणि भाजप युतीत ठरल्याप्रमाणे भाजप दिल्ली पाहणार आणि शिवसेना महाराष्ट्र पाहणार, असे बाळासाहेबांनी भाजपला सांगितले होते. त्यातच युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, हे लक्षात आल्यानेच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युती तोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि स्वत: मुख्यमंत्री झाले, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे.
हेही वाचा