Advertisement

लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?


लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?
SHARES

मागील २५ ते ३० वर्षांच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना माझ्यावर एकही आरोप झाला नाही. मात्र मंत्रीपदावर बसताच माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. आरोप सिद्ध झालेले नसताना लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून आ. एकनाथ खडसे यांनी मंगळवारी सगळ्यांना अचंबित केलं.


काय म्हणाले खडसे?

आपल्यावर झालेल्या आरोपांची अॅण्टी करप्शन, सीआयडी, लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात आली. मात्र माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला नाही. तरीही जनतेसमोर नाथाभाऊ कसे नालायक आहे हे भासवण्यासाठी खोडसाळ आरोप करण्याचा प्रयत्न काही जणांनी केले. तरीही अशा बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का? असा प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत कारवाईबाबत धोरण स्पष्ट करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांना केलं.


लोकप्रतिनिधीना बदनाम करण्याचा प्रयत्न

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माझ्यावर आरोप करत काही जणांनी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्लिप जाहीर करून बेछूट आरोप करतात. लोकप्रतींधींना बदनाम करतात. अशा व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे, असा मुद्दा उपस्थित करत आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.


गंभीर दखल घेतली जाईल

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेतली जाईल. तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील, असं आश्वासन दिलं. त्याबरोबर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्याची सूचना केली.



हेही वाचा-

'न्यूज १८-लोकमत' विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा