Advertisement

राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाचा मुहूर्त अखेर ठरला, पण खडसेंच काय?


राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाचा मुहूर्त अखेर ठरला, पण खडसेंच काय?
SHARES

काँग्रेसला रामराम करत स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणाऱ्या राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाचा मुहूर्त निश्चित झाला असून, ११ डिसेंबरपूर्वी राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


खडसेंच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री विचार करतायेत -

भोसरी येथील एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून खडसेंना पाय उतार व्हावे लागले होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करत आहेत, असेही चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.


खडसेंचा भाजपाला घरचा आहेर -

दरम्यान माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ज्यांनी भाजपला वाढविण्यासाठी मेहनत घेतली. पक्ष वाढीसाठी आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली. ते नेते सत्तेबाहेर आहेत तर नारायण राणेंसारखे 'त्यागी' नेते सत्तेत आहेत, अशी सल एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.



हेही वाचा - 

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा