Advertisement

तर ठरलं! एकनाथ शिंदे गटाचे नवीन चिन्ह आहे...

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह पाठवले होते. त्यानुसार एका चिन्हाची निवड करण्यात आली आहे.

तर ठरलं! एकनाथ शिंदे गटाचे नवीन चिन्ह आहे...
SHARES

दोन गटात विभागलेल्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने नवीन नावं दिली आहेत. तसेच काल, सोमवारी उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले होते. मात्र, शिंदे गटाने दिलेले पर्याय नाकारत निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पुन्हा तीन पर्याय देण्यास सांगितले होते.

त्यानुसार आता शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह पाठवले आहेत. यात १) तळपता सुर्य २) ढाल-तलवार आणि ३) पिंपळाचं झाड हे तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठवले आहेत.

निवडणूक आयोगाने ढाल-तलवार या पर्यायाला होकार दिला आहे. त्यानुसार आता शिंदे गटाचे नवीन चिन्ह आहे ढाल-तलवार. तर बाळासाहेबांची शिवसेना या नावाचा त्यांना सोमवारीच परवानगी मिळाली होती

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सुरुवातील त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशु, उगवता सुर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची धार्मिक चिन्ह फेटाळली होती. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सुर्य ही सारखी चिन्हे सादर केली होती त्यामुळे ही चिन्हे रद्द करण्यात आली होती. 'मशाल' हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पुन्हा नव्याने पर्याय देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून १) तळपता सुर्य २) ढाल-तलवार आणि ३) पिंपळाचं झाड हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.



हेही वाचा

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात

'मशाली'मुळेच शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली, चिन्हाने घडवलाय इतिहास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा