Advertisement

‘हा’ निवृत्त पोलीस अधिकारी देणार ठाकूर कुटुंबाला टक्कर

पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हाती शिवबंधन बांधल्यानंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

‘हा’ निवृत्त पोलीस अधिकारी देणार ठाकूर कुटुंबाला टक्कर
SHARES

पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हाती शिवबंधन बांधल्यानंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

नालासोपाऱ्यातून लढणार

वसई-विरार भागात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा एकछत्री अंमल आहे. ‘बविआ’ चे क्षितीज ठाकूर नालासोपारा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. या परिसरातील ठाकू कुटुंबाची ही एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी शर्मा यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून  निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. नालासोपाऱ्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्याचा पाठिंबा शर्मा यांना मिळू शकतो.

१५० एन्काऊंटरसाठी प्रसिद्ध

५९ वर्षीय शर्मा १९८३ साली पोलीस सेवेत रूजू झाले होते. घाटकोपर आणि माहीम पोलीस ठाण्यासोबतच ते बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्ये कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक १५० एन्काऊंटर करण्याचा रेकाॅर्ड शर्मा यांच्या नावावर आहे. यांची दखल प्रसिद्ध टाइम मॅगझिनने देखील घेतली होती. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. मे २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते.  

लखनभय्या प्रकरण अडचणीचं

नालासोपाऱ्यातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शर्मा बहुचर्चित लखनभय्या प्रकरणामुळे अडचणीत येऊ शकतात. कारण या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे लखनभय्या यांचे भाऊ शर्मा यांच्या विरोधात प्रचार करतील, असं म्हटलं जात आहेत.हेही वाचा-

गुन्हेगारांचा कर्दनकाळ राजकारणात कोणाचा एन्काउंटर करणार?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा अखेर मंजूरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement