Advertisement

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचं समन्स, एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालयालयाने कथित एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार ६ जून रोजी पटेल यांना सकाळी ११.३० वाजता चौकशीसाठी हजर व्हायचं आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचं समन्स, एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी
SHARES

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालयालयाने कथित एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार ६ जून रोजी पटेल यांना सकाळी ११.३० वाजता चौकशीसाठी हजर व्हायचं आहे.

काय आहे प्रकरण?

उद्योग सल्लागार दीपक तलवारने यूपीए सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून विशिष्ट विमान कंपन्यांना झुकते माप देत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग ३  आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या मोबदल्यात त्याला २००८- ०९ दरम्यान २७२ कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे, असे आरोप दीपकवर आहेत. या अंतर्गत त्याच्यावर ५ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

सध्या तुरूंगात

ईडीने ऑगस्ट २०१७ मध्ये या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. याप्रकरणात सीबीआयने नागरी उड्डान मंत्रालयाचे अधिकारी, एनसीआयएल, एअर इंडिया आणि अज्ञात व्यक्तिंविरोधात एफआयआर दाखल केला. चाैकशी सुरू होताच दीपक देश सोडून पळाला होता. त्यानंतर दुबईतून प्रत्यार्पण करत ईडीने त्याला अटक केली. ईडीने दीपकला अटक केली असून सध्या तो तुरूंगात आहे.

दीपक माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र असल्याने या हवाई वाहतूक उद्योग करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पटेल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 



हेही वाचा-

संविधानाच्या रक्षणासाठी भाजपाविरोधात इंच इंच लढू- राहुल गांधी

भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी ‘ही’ नावे चर्चेत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा