राष्ट्रवादीची मुख्यमंत्री दालनात 'कांदाफेक'

 Mumbai
राष्ट्रवादीची मुख्यमंत्री दालनात 'कांदाफेक'

शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला बुधवारी धडक दिली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कांदे फेकत जोरदार घोषणाबाजी केली. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती मुंबई अध्यक्षा आदीती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शेतातील कांदे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याकडे सोपवत मुख्यमंत्र्यांना कांदे भेट देण्याची मागणी केली.

दौंड तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आपल्या शेतातील कांद्याचं पिक ट्रॅक्टरने जमिनीत गाडून टाकल्याची घटना नुकतीच घडली. अशा परिस्थितीमध्येही सरकार ठोस उपाययोजना करत नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी आदोलकांना ताब्यात घेतले.

Loading Comments