SHARE

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आक्रमक अवतार विधानसभेत अनेकदा पहायला मिळाला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खडसेंचा आवेश पुन्हा पहायला मिळाला, तोही स्वतःच्याच पक्षाच्या सरकारविरोधात! विधानसभेतल्या आपल्या भाषणात एकनाथ खडसेराज्य सरकारच्या गृह खात्यावर बरसले. विशेष म्हणजे खडसे यांच्या मदतीला विरोधी पक्षांचे आमदार धावून आले.

का दिला खडसे यांनी घरचा आहेर?

राज्यातील सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा प्रकल्पाबाबत विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी विचारलेल्या सायबर गुन्ह्याबाबतच्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या अामदारांनी भाग घेतला. सायबर गुन्ह्याच्या मु्द्द्यावर सभागृहातले वातावरण चांगलेच तापले. एकनाथ खडसे यांनी चर्चेत भाग घेताना आक्रमक पवित्रा घेतला. 

सायबर गुन्ह्यात सगळ्यात जास्त मला भोगावे लागले.  भंगाळेमुळे  देशभरात माझी बदनामी झाली, आपल्या कुमकवत सायबर कायद्यांमुळे आरोपी पकडला असूनही तो मोकळा सुटला आहे, त्यामुळे कठोर कायदे करा, अशी मागणी खडसे यांनी सभागृहात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही खडसे यांच्या मागणीला दुजोरा दिला. मात्र चर्चेला उत्तर देताना राज्याचे गृृहराज्यमंत्री(शहर) रणजीत पाटील यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

गृहराज्यमंत्र्यांची कोंडी

सायबर गुन्हेगारीविरोधात गृहखात्याने केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटीलयांनी पोलिसांना या कायद्याचे शिक्षण प्रशिक्षणादरम्यानच देण्यात येते. राज्यात 47 सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. दरम्यान, यावेळी सदस्यांनी किती जणांना राज्याच्या सायबर कायद्यांतर्गत शिक्षा झाली, हे सांगण्याची आग्रही मागणी आमदारांनी केली. 

खडसेंचा आक्रमक पवित्रा, विरोधी पक्षाच्या आमदारांची खडस यांना मिळालेली साथ आणि स्वतःच्याच खात्याच्या कारभाराचा अपुरा अभ्यास यामुळे गृहराज्यमंत्री रणजीत देसाई यांची झालेली कोंडी हा विधानभवन परिसरातसुद्धा चर्चेचा विषय ठरला. 


हे ही वाचा

खडसे 'कमबॅक'च्या तयारीत!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या