Advertisement

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीला शरद पवार हजर? 'त्या' फोटोचा पर्दाफाश

फोटोवरून सुरू झालेल्या चर्चांवर राष्ट्रवादीनं मोठं वक्तव्य केलं आहे.

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीला शरद पवार हजर? 'त्या' फोटोचा पर्दाफाश
SHARES

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. पण या फोटोत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील फोटोत दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पण या फोटो मागील सत्य अखेर समोर आलं आहे. या फोटोवरून सुरू झालेल्या चर्चांना देखील राष्ट्रवादीनं पूर्णविराम दिला आहे.

शहा आणि फडणवीस यांच्या भेटीच्या फोटो मार्फ करून शरद पवार सुद्धा बैठकीला हजर असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीनं यावर आक्षेप घेत हा फोटो बनावट असून फोटोशॉप केला असल्याचं उघड केलं आहे.

आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो समोर आला. पण, अचानक एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थितीत होते, असं या फोटोतून दाखवण्यात आलं.

राष्ट्रवादीनं या फोटोचा पर्दाफाश केला आहे. 'अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मार्फ केलेले बचकांडे हातखंडे आहे, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

'आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर पोलीस असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावं' अशी विनंती सुद्धा राष्ट्रवादीनं सायबर पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत बऱ्यात घडामोडी घडल्यात. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'अमित शहा हे आमचे नेते आहे. त्यामुळे दिल्लीत आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतच असतो. त्यामुळे कुठलाही संघटनेमध्ये बदल नाही, मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक झाली, असं फडणवीस यांनी सांगितलं.



हेही वाचा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी - बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा