Advertisement

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी - बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी - बाळासाहेब थोरात
SHARES

कोरोनाव्हायरस (COVID-19) साथी दरम्यान महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्यांपैकी एक होता. कोरानामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

तथापि, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सरकारनं भरपाईची रक्कम ४ लाखांपर्यंत वाढवावी, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

अहवालानुसार, मृतांच्या नातेवाईकांना दिलेली भरपाईची रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. ज्याद्वारे ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ७५:२५ च्या प्रमाणात सामायिक केली जाते.

आत्तापर्यंत, ५०,००० रुपये नुकसान भरपाई निधी म्हणून ठरवण्यात आले होते. परंतु मंत्री थोरात यांनी ही रक्कम अपुरी आहे आणि ती वाढवावी अशी मागणी केली आहे.

११ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात ५०,००० भरपाई मंजूर करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ज्याद्वारे अधिकार्‍यांनी सांगितलं की, ही रक्कम साथीच्या आजारादरम्यान मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना अनुग्रह म्हणून दिली जाईल.

इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात मंत्री थोरात यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) नुसार, केंद्रानं ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी आणि राज्याने २५ टक्के नुकसान भरपाई द्यावी.

राज्य सरकारने ४ लाखांपैकी २५ टक्के म्हणजे १ लाख रुपये मंजूर करावे आणि उर्वरित रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा. प्रत्येकाला ४ लाख रुपये नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.

केंद्रानं पेट्रोलियम उत्पादनांमध्ये लाखोंची कमाई केली आहे आणि श्रीमंत लोकांना कॉर्पोरेट करात सूट दिली आहे. परंतु जेव्हा कोविड पीडितांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात."हेही वाचा

भाजपकडून CM फंडच्या वापराच्या चौकशीची मागणी

मुंबई पोलिसांची MIM च्या बीकेसीतल्या रॅलीला परवानगी नाही

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा