Advertisement

मोबाईल चार्जिंगसाठी डोक्यावरच ठेवला सोलर पॅलेट


मोबाईल चार्जिंगसाठी डोक्यावरच ठेवला सोलर पॅलेट
SHARES

नाशिकवरून निघालेलं शेतकऱ्यांचं वादळ अखेर रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झालं. यावेळी या शेतकरी मोर्च्यात सामील झालेले काही शेतकरी बांधव आपल्या बांधवांचे मोबाईल चार्ज करण्याचं काम करताना दिसले.

शेतकरी बांधव मोबाईलद्वारे आपल्या घरच्यांच्या संपर्कात रहावे यासाठी काही तरुणांनी सोलार पॅलेटद्वारे चार्जिंगची व्यवस्था केली. विशेष म्हणजे हा सोलार पॅलेट डोक्यावर घेऊन या शेतकरी बांधवांनी नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास केला.

या शेतकरी मोर्चेकऱ्यांना मोबाईलच्या चार्जिंगची सोय व्हावी म्हणून नथू निवृत्ती उदार या शेतकऱ्याने वेगळी शक्कल लढवली. हा शेतकरी गेले 7 दिवस डोक्यावर सोलर पॅलेट घेऊन हा चालत होता. यामधून मोबाईल चार्जिंगचा प्रश्न सोडवण्याचा त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.


कशी सूचली संकल्पना?

नथू हे स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यामुळे हा प्रयोग त्यांंनी घरात करून पाहिला. हा प्रयोग घरी यशस्वी केल्यानंतर त्यांनी याचा उपयोग शेतकरी भावांना व्हावा म्हणून ते गेले ७ दिवस डोक्यावर सोलार पॅलेट घेऊन फिरत आहेत.


हेही वाचा - 

शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या भोजनाची पनवेलकरांनी केली सोय

काठीहल्ला करा नाहीतर गोळ्या घाला, आता माघार नाही! शेतकऱ्यांचा निर्धार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा