Advertisement

'शेतकरी रामेश्वर भुसारे यांना मारहाण झाली नाही'


'शेतकरी रामेश्वर भुसारे यांना मारहाण झाली नाही'
SHARES

मुंबई - औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातून आलेल्या रामेश्वर भुसारे या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण झाली नसल्याचं गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी विधान परिषदेत यासंदर्भात निवेदन देताना त्यांनी ही माहिती दिलीय.

सहाव्या माळ्यावर भुसारे आक्रमक झाले होते. भुसारे यांना लिफ्टमधून नेत असताना ते शिवीगाळ करत होते आणि लाथाबुक्के मारत होते. पोलीस व्हॅनमध्ये बसलेले असताना त्यांनी व्हॅनमध्ये वाहतूक नियत्रंणाकरिता असलेल्या नायलॉन रस्सीने स्वतः चा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस हवालदाराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पोलिसाच्या हाताचा चावा भुसारे यांनी घेतला. त्यावेळी हात सोडवताना रामेश्वर भुसारे यांच्या ओठाला दुखापत झाली. या निवेदनात राज्य सरकारने मान्य केले आहे की त्यांच्या शेतीचे गारपिटमुळे नुकसान झाले आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. बँकेकडे असलेल्या त्यांच्या प्रलंबीत अर्जाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासनही रणजीत पाटील यांनी या वेळी दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा