नव्या वर्षाचं स्वागत, असंही...

 BDD Chawl
नव्या वर्षाचं स्वागत, असंही...
नव्या वर्षाचं स्वागत, असंही...
See all

वरळी - वरळी नाक्यावरच्या गोपचार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आणि स्थानिक नागरिक अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाचं अभिनव स्वागत करण्यात येतंय. नव्या वर्षाचं स्वागत नव्या गोष्टींनी व्हावं, यासाठी दहशतवादी हाफिज सईदची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यादरम्यान सीमेवर भारतीय जवान हुतात्मा होत आहेत. हे हल्ले परतवून लावण्यासाठी सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केला. तरीही दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. हे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय करायला हवं, यासाठी अभिप्राय नोंदवण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. दहशतवादी हाफिज सईदच्या प्रतिकृतीसह अभिप्राय नोंदवण्यासाठी कोरा बॅनरही या ठिकाणी लावण्यात आला आहे. अभिप्राय नोंदवण्यासाठी इथे गर्दी होते आहे.

Loading Comments